Latest Event Updates

लाभले आम्हास भाग्य

Posted on


आज २७ फेब्रुवारी. मराठी भाषा दिन.
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

आले दिवस आठवांचे

Posted on


आठवांचे दिवस
आठवे आज दिसू लागली
माझ्या मनी
वाहू लागली
या शब्दामधुनी
आठवे आज आठवू लागली,
……आले दिवस आठवांचे
आले दिवस आठवांचे
उरी चाहूल कशाचे?
दुरावलेल्या क्षणांना
आठवून पाहायचे
….. आले दिवस आठवांचे
माझा मैतर आठव
त्याच वाहन मन
क्षणा होऊनी दूर
दावि सोनियाचे दिन
… आले दिवस आठवांचे
स्पर्शता क्षणांना त्या
हात का थरथरायचे
ओठ हसता गालातून
आसू का यायचे
…..आले दिवस आठवांचे
घन निळा आठवांचा
असा कधी कधी बरसतो
डोळा चातक माझा
असा वाट लावून बसतो
…… आले दिवस आठवांचे

माझे आयुष्य

Posted on


माझे आयुष्य

माझे आयुष्य माझ्याशी कधी बोलेल
जगून काय मिलावशील तू ,
मी कधी विचारेल तिला मरताना
देखिल साथ देशील तू ………..

सतत येनारया मित्रांच्या अरोल्या
मनाला समाधान देतात,
पण दुखातली एक मैत्रीची हाक
डोळ्यात आनंदाश्रु आणतात…………..

आपन कधी इतरांवर खुप
विश्वास करतो,
तोच क्षण आपल्याला
स्वतःपासून तोडतो………..

आई आई ये ना जरा…-sandeep khare

Posted on Updated on


आई आई ये ना जरा…
बाबाकडे बघ
बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढग !
बाबा असा बघायला दिसे ना गं बरा आळीमिळी गुपचिळी… पडलेला वारा ! हले नाही… डुले नाही… जणू काही फोटो आवाजही त्याला माझा लांबूनच येतो ! उभा तर उभा आणि बसे तर बसे
हसे तेव्हा अजूनच कसनुसा दिसे ! विचारले- “बाबा, काय पाहतोस सांग?!’ बघे म्हणे- “”आभाळाचा लागतो का थांग- काय सांगू पोरी तुला कळणार नाही आभाळ न आले हाती; जमीनही नाही ! चहूकडे कोंडलेल्या जगण्याच्या दिशा
हाती नाही काम; गाडा चालायचा कसा ! घोडा झाला तरी काही शिकला ना बाबा विकायच्या जगामध्ये टिकला ना बाबा!” आणि मग उठुनिया कुशीमध्ये घेतो
ओले डोळे पुसुनिया ओली पापी घेतो… घाबरतो जीव; बाबा असे काय बोले? चित्रातले रंग त्याच्या जसे ओले ओले… चेहऱ्याचा रंग त्याच्या सांग कुठे गेला ? हसणारा बाबा कुणी पळवून नेला?….
आई आई ये ना जरा बाबाकडे बघ बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढग….!
Source:- saptrang sunday magazine by esakal
poet:- sandeep khare

क्षण

Posted on


क्षण
काही लोक कधी भेटतात
चार क्षणातच ते आयुष्य बनतात,
या वाटेवर  आठवांचे ठसे सोडून कधी मग ते परततात
या ठस्यावर फुल आज उमलू लागले
जसे गंधा बरोबर कोणी आठवू लागले,
क्षणाचे हे खेळ सारे,
क्षणातच भेटले ते गंधित वारे,
क्षणातच आले, क्षणातच गेले,
आठवांचे ठसे सोडून असे का परतले?

आयुष्य, चूका आणि सुधार

Posted on


कधी एकदा ऐसा मी एकटा बसतो
जुन्या पानावरचे ठसे असे न्याहलातो
किती चाललो, किती चुकलो,
गणित तयांचे आयुष्यासंग मांडतो,
किती झाले सुधार तयात
हेही कधी शोधतो….

किती गेले उमटुनी डाग,
असे या स्वच्छ कागादावारी
हा हा म्हणुनी मिटून जाइल,
असते का असे हे सोपेतरी,
काट करुनी मागच्या ओळी
शब्द नवे रचतो,
किती झाले सुधार तयात
हेही कधी शोधतो….

शब्द आज हे आहे एक,
जाचक हत्यार मजसाठी,
याहून आहे का घातक,
आयुष्य लढा लढ़ न्यासाठी,
हेच वापर करुन,
मी आयुष्य माझे लोटतो,

किती झाले सुधार तयात
हेही कधी शोधतो….

its my life

Posted on Updated on


बचपन की वो गली
जहासे मेरी यादे मुझे ले चली,
वो तेढा मेढा रास्ता
जहासे शुरू हुई मेरी दास्ताँ
दादी का वो प्यार
कभी बिछड़े मेरे वो यार
याद आये मुझे वो हर बात
जो सुनाये मुझे मेरी दास्ताँ

छोटी-छोटी  बातो पे मेरा रूठना
कभी-कभी बात ना करे तो रोना,
खेले तेरे संग वो रंग
वो दिवाली की उमंग
तेरे साथ बाते वो बेर
भूलूंगा कैसे वो सहेर
याद आये मुझे वो हर बात
जो सुनाये मुझे मेरी दास्ताँ

College Life

Posted on


काही असे क्षण असतील
कधी न विसरु शकतील,
मनात असे सामावतील
आठवता डोळा पाणी आणतील…

घरात बसून जुणी गानी ऐकताना
हे दिवस आठवतील ,
college च्या कट्ट्याची रंगत
मनात जानवतील…

जग बदलेल मी बदलेल
कॉलेज च्या आठवणी कधी न विसरेल,
कधी वडापाव ची चव चाखल्यावर
पापणी ओलावणार क्षण आठवल्यावर

मोबाइल मध्ये balance असेल
पण बोलायला मित्रच सोबत नसेल
क्षण- क्षण ओठ बोलायला तरसेल
पण मित्राचा missed call च हरवेल …

college life अशीच आठवेल
कधी हसवेल तर कधी रडवेल
कधी काही आठवणी अशा आठवतील
मैत्रीची अनमोल साथ सांगतील

कधी मी i-pod वर गाणे ऐकले
काही गाणे तुझी आठवण देउण गेले,
कधी कुठे fm  वर ती गाणी लागेल
तुला dedicate केलेल्या गाण्याची सुरवात च रडवेल ……..

आठवणी आठवल्यावर मन बैचन होईल,
पण परतायला college life च नसेल

जशा झाडावर कोरलेल्या खुणा ना मिटेल
तशा college life च्या खुणा मनावर दिसेल